

BCCI introduces strict IPL 2026 rule limiting movement of benched players
esakal
IPL 2026 new rule benched players movement: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील १४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात दिल्लीत सुरू आहे. हा सामना सुरू असताना आयपीएल आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) यांनी एक नवा नियम आणला आहे. आयपीएल सामन्यादरम्यान बाकावर बसलेल्या सर्व खेळाडूंना मैदानावर फिरण्याची परवानगी नाही. टीमने सामना सुरू होण्यापूर्वी दिलेल्या यादीत नाव असलेल्या १६ खेळाडूंना ही परवानगी असेल. यादीत ज्याचे नाव नाही त्या अतिरिक्त खेळाडूंनाही मैदानात प्रवेश करण्याची परवानगी नाही. हा नवीन नियम फ्रँचायझींना कळवण्यात आला आहे.