India’s Policy Towards International Sporting Events India vs Pakistan : भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही, याचा फैसला झाला आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयाने आज आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील पाकिस्तानाशी संबंधित क्रीडा स्पर्धांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानशी संबंधित क्रीडा स्पर्धांबाबत भारताची भूमिका ही देशाशी असलेल्या एकूण धोरणाशी सुसंगत आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणार नाही. द्विदेशीय स्पर्धांच्या बाबतीत, भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नाही आणि पाकिस्तानच्या संघांना भारतात खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले गेले आहे.