Harmanpreet Kaur Points Finger At Sophie Ecclestone
महिला प्रीमिअर लीग २०२५ मध्ये काल यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात लढत झाली. मुंबई इंडियन्सने ६ विकेट्स व ९ चेंडू राखून मॅच जिंकली, परंतु या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर व सोफी एक्लस्टोन यांच्यात झालेल्या राड्याने सर्वांचे लक्ष वेधले. हरमनप्रीत कौर यूपीच्या खेळाडूला बोट दाखवून मैदानाबाहेर जाण्याचा इशारा करत असल्याचे दिसत आहे. या दोघींमधील भांडण सोडवण्यासाठी अम्पायर व सहकारी खेळाडूंची पळापळ झाल्याचेही दिसतेय.