Akash Madhwal joins Chennai Super Kings as replacement for injured Ayush Mhatre
esakal
CSK replacement player IPL 2026 Akash Madhwal: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मोठा डाव टाकला आहे. आयपीएलमध्ये MI कडूनच खेळणाऱ्या खेळाडूला CSK ने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. MI vs CSK सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज होत आहे आणि त्यापूर्वी त्यांनी आयुष म्हात्रेची ( Ayush Mhatre Replacement) रिप्लेसमेंट जाहीर केली आहे. त्यांनी MI चा नेट गोलंदाज आकाश मढवाल याला करारबद्ध केले आहे. खलील अहमदने माघार घेतल्यानंतर आकाश ट्रायलसाठी CSK च्या ताफ्यात दाखळ झाला होता, परंतु त्याची आता आयुषच्या जागी निवड झाली आहे.