Rahul Dravid becomes owner of Dublin Guardians ETPL
esakal
Rahul Dravid becomes owner of Dublin Guardians ETPL : भारतीय क्रिकेटचा 'द वॉल' आणि माजी कर्णधार व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आता एका नव्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 'युरोपियन टी-२० प्रीमियर लीग' (ETPL) मधील 'डबलिन गार्डियन्स' (Dublin Guardians) या संघाचे मालकी हक्क द्रविडने विकत घेतले आहेत. सोमवारी डबलिन येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात या सहाव्या आणि अंतिम संघाच्या मालकाची अधिकृत घोषणा करण्यात आली.