आशिया कप २०२५ साठी पाकिस्तानच्या १७ सदस्यीय संघातून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला वगळण्यात आले आहे.
ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-२ फलंदाजांमध्ये असूनही, स्ट्राइक रेटच्या कारणामुळे त्यांना डच्चू मिळाला.
माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी सिलेक्टरवर तीव्र टीका केली व बाबरला वगळणे मोठी चूक असल्याचे म्हटले.
Babar Azam controversy ahead of Asia Cup 2025: आशिया कप २०२५ साठी पाकिस्तानने जाहीर केलेल्या १७ सदस्यीय संघावरून वातावरण तापले आहे. संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातून माजी कर्णधार बाबर आझम तसेच प्रमुख यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांना डच्चू दिला गेला आहे. ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दोघेही टॉप-२ मध्ये आहेत. पण, त्यांच्या स्ट्राइक रेटमुळे दोघांवरही टीका होत आहे.