

Blind Asia Cup 2026, India vs Bangladesh
Sakal
Blind Asia Cup 2026, India vs Bangladesh: 'अंधांचा आशिया चषक २०२६' (Asia Cup Cricket for the Blind 2026) स्पर्धेत भारतीय पुरुष अंध क्रिकेट संघाने यजमान बांगलादेशचा ८ गडी राखून एकतर्फी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. ॉ
आता येत्या २० नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडणार आहे. साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्ध भारताला अवघ्या एका गड्याने निसटता पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात त्या पराभवाची परतफेड करत विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.