

Pakistan Football Team Gives India Guard of Honour | SAFF Championship
Sakal
Pakistan Footballers Honour India After Heated SAFF Championship Final : भारताच्या फुटबॉल संघाने मंगळवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर २-१ असा विजय मिळवून सॅफ या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर मोहर उमटवली. भारतीय संघाने दहाव्यांदा या स्पर्धेच्या अजिंक्यपदाचा मान मिळवला हे विशेष. पण यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना गार्ड ऑफ ऑनर देत खिलाडूवृत्तीचे दर्शन दिले, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
पाकिस्तानने पूर्वार्धात १-० अशी आघाडी मिळवत भारतीय संघाला दबावाखाली टाकले होते, मात्र उत्तरार्धात सुहेल अहमद भट व संदीप मंडी यांनी भारतीय संघासाठी शानदार गोल करीत लक्षणीय विजय साकारून दिला.