
Border Gavaskar Trophy 2024-25:
भारतीय संघ दुसऱ्या कसोटीच्या तयारीसाठी कॅनबेरा येथे पोहोचला आहे. अध्यक्षीय एकादश संघाविरुद्ध दोन दिवसीय पिंक बॉल सराव सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे सराव सामना अजूनही सुरू झालेला नाही. अम्पायर खेळपट्टीची पाहणी करताना दिसत आहेत, परंतु रिपरिप पाऊस सुरूच आहे. IND vs AUS यांच्यातला दुसरी कसोटी सामना हा पिंक बॉलवर म्हणजेच दिवस-रात्र असणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी मागील दोन दिवस नेट्समध्ये पिंक बॉलवर सराव केला आणि ते ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिकेतील आघाडी आणखी भक्कम करण्यासाठी सज्ज आहेत.