Hardik Pandya and Suryakumar Yadav are likely to miss the IPL 2026 clash.
esakal
Hardik Pandya and Suryakumar Yadav unavailable vs Punjab Kings: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबईला ११ सामन्यांत ८ पराभवांचा सामना करावा लागला आहे आणि त्यामुळे आता उर्वरित तीन सामने जिंकूनही ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकणार नाही. अशात त्यांच्यासमोर एक वेगळं संकट उभं राहिलं आहे. मुंबई इंडियन्स मागील दोन सामन्यांत हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत खेळतेय आणि सूर्यकुमार यादवने या दोन्ही सामन्यांत नेतृत्व केले. पण, पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यासाठी हार्दिक व सूर्या, दोघंही उपलब्ध नसल्याचे वृत्त समोर आले आहे. अशा परिस्थितीत PBKS विरुद्धच्या सामन्यात MI चे नेतृत्व कोण करेल, हा पेच निर्माण झाला आहे.