Jasprit Bumrah ruled out of IND vs ENG 5th Test 2025 : मालिकेत १-२ असा पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला पाचव्या कसोटीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठीच्या अंतिम कसोटीत खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. उद्यापासून दी ओव्हल येथे ही कसोटी सुरू होत आहे आणि क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमने बुमराहच्या दुखापतीचा विचार करता हा निर्णय घेतला आहे.