MS Dhoni Likely to Play First IPL 2026 Match Against Mumbai India
esakal
MS Dhoni comeback impact on Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील त्याचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. २३ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर धोनी विरुद्ध रोहित शर्मा असा सामना पाहायला मिळणार आहे. ४४ वर्षीय धोनीने प्री-सीझन कॅम्पमध्ये पोटरीच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे माघार घेतली होती, परंतु तो आता पूर्णपणे तंदुरुस्त होण्याच्या जवळ आहे. CSKचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांच्याच मैदानावर आहे, परंतु धोनी संघासोबत प्रवास करेल की नाही याची माहिती मिळालेली नाही.