ब्रेकिंग : वैभव सूर्यवंशीसोबत धक्काबुक्की... खेळाडूंवर कारवाई, भारताच्या युवा फलंदाजाला कोणती शिक्षा मिळाली?

Match referee sanctions after Dambulla bust-up explained: दांबुला येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यातील धक्काबुक्की प्रकरणावर अखेर सामनाधिकारी यांनी कारवाई केली आहे. भारतीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीसोबत झालेल्या वादानंतर श्रीलंकेच्या हळंबागेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

Latest update on Dambulla fracas involving Vaibhav Sooryavanshi: भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातला सामना सुपर ओव्हरमुळे नव्हे, तर वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूंमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे गाजला... आता या सामन्यादरम्यान शिस्तभंग करणाऱ्या खेळाडूंवर श्रीलंका क्रिकेटने (SLC) कारवाई केल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सामनाधिकारी प्रदीप जयप्रगाश यांनी श्रीलंका 'अ' आणि भारत 'अ' सामन्यात झालेल्या वादानंतर संबंधित खेळाडूंवर निर्बंध जाहीर केले आहेत. विशेन हलंबगे हा या संपूर्ण घटनेचा प्रमुख सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com