Rohit Sharma to Miss MI vs PBKS Clash in IPL 2026;
esakal
Rohit Sharma will not play MI vs PBKS game : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी फार चांगली झालेली नाही आणि त्यात आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. MI ने आयपीएल २०२६ मध्ये चार सामन्यांत ३ मध्ये पराभव पत्करला आहे. सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवल्यानं त्यांना सलग तीन सामने गमवावे लागले. मागील सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने दुखापतीमुळे मैदान सोडले होते आणि तो पुढील सामन्यात खेळणार की नाही, ही चिंता होती. जे घडायला नको तेच झाले आणि रोहितने पंजाब किंग्सविरुद्धच्या ( MI vs PBKS) सामन्यातून माघार घेतली आहे. तो हा सामना खेळणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.