Breaking: वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड, तिलक वर्मा कॅप्टन! तिरंगी मालिकेसाठी संघ जाहीर

Vaibhav Sooryavanshi selected in India A squad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने श्रीलंकेत होणाऱ्या आगामी तिरंगी वनडे मालिकेसाठी इंडिया ‘अ’ संघाची घोषणा केली असून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची निवड ही सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे.
Vaibhav Sooryavanshi

Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

India A squad for Sri Lanka tri-series 2026 : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला अखेर भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. पुरुष निवड समितीने जून २०२६ मध्ये श्रीलंकेत होणाऱ्या आगामी वन डे तिरंगी मालिकेसाठी भारत 'अ' संघाची निवड केली आहे. या तिरंगी मालिकेत यजमान श्रीलंका 'अ', भारत 'अ' आणि अफगाणिस्तान 'अ' हे संघ सहभागी होतील. मर्यादित षटकांच्या तिरंगी मालिकेनंतर, भारत 'अ' संघ श्रीलंका 'अ' संघाविरुद्ध दोन बहुदिवसीय सामनेही खेळेल, त्यासाठीचा संघ नंतर जाहीर केला जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com