ENG vs IND, 3rd Test: दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंड संघ खवळला! लॉर्ड्स खेळपट्टीबाबत केली मोठी मागणी, भारताला आव्हान देणार?

ENG vs IND, 3rd Test, Pitch Update: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरा सामना लॉर्ड्सवर होणार आहे. लॉर्ड्स सामन्यासाठी इंग्लंड संघ वेगळी स्टॅटर्जी आखत असल्याचे समजत आहे.
England Test Team
England Test TeamSakal
Updated on

भारत आणि इंग्लंड संघात होत असलेली अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी २०२५ ही कसोटी मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंड संघाला भारतीय संघाने ३३६ धावांनी पराभवाचा मोठा धक्का दिला.

यासह बर्मिंगहॅममध्ये पहिल्या विजयाची नोंदही केली. या सामन्यानंतर मात्र आता इंग्लंड संघ खडबडून जागा झाल्याचे दिसत आहे. इंग्लंडने दुसरा सामना संपल्यानंतर काही तासातच संघात वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सनला संधी दिली आहे. तो दुखापतीमुळे संघातून बाहेर होता.

England Test Team
ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com