
India vs England 2nd T20I: भारत विरुद्ध इंग्लंड संघात टी२० मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (२५ जानेवारी) चेन्नईला पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघांत शेवटपर्यंत चूरस दिसली होती. दरम्यान, या सामन्यातील एक धावबादही अत्यंत महत्त्वाचा ठरला.
झाले असे की भारतीय संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पण इंग्लंड नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. मात्र, असं असलं तरी इंग्लंडचा प्रत्येक फलंदाज फलंदाजीला आल्यानंतर आक्रमक खेळण्याचा प्रयत्न करत होता.