
India vs England 2nd T20I: भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी चेन्नईतील एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात २ विकेट्सने विजय मिळवला. या रोमांचक विजयासह भारताने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडने भारतासमोर १६६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने १९.२ षटकात पूर्ण केला. भारताच्या या विजयात तिलक वर्माने अर्धशतक ठोकत मोलाचा वाटा उचलला.