
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी चेन्नई सुपर किंग्सने जवळपास महिन्याभर आधी तयारीला सुरुवात केली आहे. यंदा चेन्नई सुपर किंग्स संघात अनुभवी फिरकीपटू आर अश्विनचेही पुनरागमन झाले आहे.
जवळपास १० वर्षांनी अश्विन पुन्हा चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे. त्याने २००९ साली याच संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. २०१० आणि २०११ साली विजेतेपद मिळवलेल्या चेन्नई संघाचाही तो भाग होता.
पण २०१६ नंतर तो संघातून बाहेर गेला. त्यानंतर तो रायझिंग पुणे सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघांचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर आता तो पुन्हा चेन्नई संघात आला आहे.