
भारताच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाचेही नाव घेतले जाते. जडेजाने आत्तापर्यंत त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही मोलाची कामगिरी बजावली असून अनेकदा भारतीय संघाला विजय मिळवून दिले आहेत.
नुकतेच ६ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने भारताच्या विजयाच महत्त्वाचे योगदान दिले होते. त्याने ९ षटकात केवळ २६ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या आहेत. यासोबतच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट्सही पूर्ण केल्या.