Australia vs New Zealand
Australia vs New Zealandsakal

Australia vs New Zealand : कॅमेरून ग्रीनचे झुंजार शतक

कॅमेरून ग्रीनच्या नाबाद १०३ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चार बाद ८९ धावा अशी अवस्था झाली असताना ग्रीन याने १६ चौकारांच्या साहाय्याने शतकी खेळी साजरी केली.

वेलिंग्टन : कॅमेरून ग्रीनच्या नाबाद १०३ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चार बाद ८९ धावा अशी अवस्था झाली असताना ग्रीन याने १६ चौकारांच्या साहाय्याने शतकी खेळी साजरी केली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवसअखेरीस नऊ बाद २७९ धावांपर्यंत मजल मारता आली.

४ बाद ८९ या धावसंख्येवरून कॅमेरून ग्रीन व मिचेल मार्श या जोडीने ६७ धावांची भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मिचेल मार्शने सहा चौकार व एक षटकारासह ४० धावांची खेळी केली. मात्र, मॅट हेन्‍री न्यूझीलंडसाठी धावून आला. त्याने मार्शला टॉम ब्लंडेलकरवी झेलबाद केले.

Australia vs New Zealand
Ind vs Eng Test Cricket : विराट थेट आयपीएल खेळणार ; पाचव्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर

मिचेल मार्श बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे इतर फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले; पण कॅमेरून ग्रीन याने एकाकी लढत दिली. त्याने १५५ चेंडूंचा सामना करताना १६ चौकारांचा पाऊस पाडला. ग्रीनने नाबाद १०३ धावांची मोलाची खेळी केली. हे त्याचे दुसरे कसोटी शतक ठरले हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com