IPL 2025 नंतर आर अश्विनला न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीकडून फेक कॉल आला.
त्या व्यक्तीने विराट कोहलीचा नंबर मागितला, अश्विनने मजेशीरपणे त्याची 'फिरकी' घेतली.
अश्विनने ओळखले की हा prank आहे आणि नंतर तो व्यक्ती ब्लॉक केला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याचा नंबर छत्तीसगडमधील दुकानदाराला दिल्यानंतर गोंधळ उडाला होता. पाटीदारचा नंबर असल्याने त्यावर विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यांचे फोन येऊ लागले होते.. ही ताजी घटना असताना भारताचा महान फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) यानेही एक किस्सा सांगितला. अश्विनला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ नंतर एक फेक कॉल आला होता आणि समोरील व्यक्ती न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवे असल्याचे त्याला सांगत होती. त्या व्यक्तीने अश्विनकडून विराट कोहलीचा नंबर मागितला. त्यानंतर अश्विनने मजेशीर फिरकी घेतली.