.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Vikram Rathour Hails Rohit Sharma: रोहित शर्माचा विसरभोळा स्वभाव आहे, हे जवळपास प्रत्येक क्रिकेटप्रेमीला माहित आहे. त्याचे अनेकदा गोष्टी विसरल्याचे किस्से चर्चेत आले आहे. पण असलं असलं तरी एक गोष्ट मात्र तो कधीच विसरत नाही, ते म्हणजे गेमप्लॅन, असं भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितलं आहे.
विक्रम राठोड यांनी असंही सांगितलं की रोहित चाणाक्ष कर्णधार आहे. राठोड यांनी तरुवार कोहली यांच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले की 'तो कदाचित टॉस जिंकल्यावर फलंदाजी करायची की गोलंदाजी, हे विसरेल किंवा त्याचा फोन किंवा आयपॅड टीम बसमध्ये विसरेल; पण तो कधीही त्याचा गेमप्लॅन विसरणार नाही. तो त्याबाबत हुशार आहे. तो योजना आखण्यात अतिशय चाणाक्ष आहे.'
याशिवाय विक्रम यांनी फलंदाज म्हणूनही रोहितचे कौतुक केले. ते म्हणाले, 'त्याची पहिली खासियत म्हणजे तो एक उत्तम फलंदाज आहे. मला वाटतं तो एका खेळाडू आहे, ज्याला त्याच्या खेळाबाबत स्पष्ट कल्पना आहे.'