Rohit Sharma Post: 'प्रिय, राहुल भाई...', रोहित शर्माचं द्रविडसाठी भावनिक पत्र; वाचा काय लिहिलंय

Rohit Sharma post for Rahul Dravid: टी२० वर्ल्ड कप विजयानंतर जवळपास एका आठवड्याने भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी भावनिक पोस्ट केली आहे.
Rahul Dravid | Rohit Sharma
Rahul Dravid | Rohit SharmaSakal
Updated on

Rohit Sharma Open Letter for Rahul Dravid: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा भारतीय संघाने 29 जून रोजी जिंकली. ही स्पर्धा जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने जवळपास एक आठवड्याने माजी प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

भारताला टी20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात राहुल द्रविडाचेही मोठे योगदान राहिले होते. त्याच्याच मार्गदर्शनाखाली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 नंतर दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरले.

दरम्यान, या विजेतेपदानंतर रोहितने त्याच्या पोस्टमध्ये राहुल द्रविडबरोबरचे फोटो शेअर केले असून एक खुलं पत्रही लिहिलं आहे.

Rahul Dravid | Rohit Sharma
Rahul Dravid: टी20 वर्ल्ड कप विजयानंतर द्रविड ड्रेसिंगमधील शेवटच्या भाषणात काय म्हणाला? BCCI ने शेअर केला Video

रोहितने लिहिले की 'प्रिय राहुल भाई, मी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधत होतो, पण मला खात्री नाही की मला ते सापडतील, त्यामुळे हा माझा प्रयत्न.'

'कोट्यावधी लोकांप्रमाणेच मी देखील तुझ्याकडे आदर्श म्हणून लहानपणापासून पाहात आलोय. पण मी नशीबवान होतो की मला तुझ्याबरोबर इतक्या जवळून काम करण्याची संधी मिळाली.

तू या खेळाचा खरोखर एक दिग्गज आहेस, पण तरीही तू तुझं कौतुक आणि यश दारातच ठेवून आमचा प्रशिक्षक म्हणून आत आलास आणि तूझ्याशी काहीही बोलताना आम्हाला सर्वांना कधीही अडचण येणार नाही, याची तू काळजी घेतलीस.'

'सर्व गोष्टींनंतरही तुझी माणूसकी आणि तुझे खेळाप्रती असलेलं प्रेम हिच तुझी मोठी देणगी आहे. मी तुझ्याकडून खूप काही शिकलो आहे आणि मी प्रत्येक आठवण आनंदाने जपेल. माझी पत्नी तुला माझी वर्क वाईफ (कामाच्या ठिकाणची पत्नी) असं म्हणते. मी नशीबवान आहे की मीही तुला तसंच म्हणतो.

'ही एकच गोष्ट (आयसीसी ट्रॉफी) होती, ज्याची कमी तुझ्याकडे होती, त्यामुळे मी आनंदी आहे की आपण हे एकत्र मिळून जिंकू शकलो. राहुल भाई, तुला माझा विश्वासू, माझा प्रशिक्षक आणि माझा मित्र म्हणायला मिळणे हा एक विशेष सन्मान आहे.'

Rahul Dravid | Rohit Sharma
Rahul Dravid Video Viral: टी20 वर्ल्ड कप जिंकून आलेल्या 'गुरू'ला लहान मुलांकडून गार्ड ऑफ ऑनर; द्रविडनंही जिंकली मनं

द्रविड आणि रोहित यांची प्रशिक्षक-कर्णधार ही जोडी गेल्या तीन वर्षापासून भारतीय संघाचं नेतृत्व करत होती. 2021 टी20 वर्ल्ड कपनंतरच रोहितला भारताचा नियमित कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच द्रविडलाही त्यानंतरच मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

दरम्यान, द्रविड 2023 वनडे वर्ल्ड कपनंतर प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणार होता. मात्र,रोहित शर्माने त्याला फोन कॉल करत टी20 वर्ल्ड कप 2024 पर्यंत जबाबदारी कायम करण्यासाठी मनवलं होतं. या फोन कॉलबद्दल द्रविडने टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहितचे आभारही मानले होते.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.