Shubman Gill Press Conference: 'रोहित-विराट संघात नसले तरी...', इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी कर्णधार गिल स्पष्ट बोलला

Shubman Gill on Test Captaincy: भारताचा कसोटी संघ गुरुवारी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी कर्णधार शुभमन गिल आणि गौतम गंभीर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. यावेळी विराट-रोहितच्या अनुपस्थितीबाबत गिलने भाष्य केले.
Shubman Gill -Gautam Gambhir
Shubman Gill -Gautam GambhirSakal
Updated on

आयपीएल २०२५ स्पर्धा संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाला ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

शुभमन गिल भारताचा नवा कसोटी कर्णधार आहे. तसेच त्याच्यासोबत ऋषभ पंत कसोटी संघाचा नवा उपकर्णधार आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोर पहिलंच आव्हान इंग्लंड दौऱ्याचे आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी शुभमन गिल आणि भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

Shubman Gill -Gautam Gambhir
Shubman Gill : मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर काय म्हणाला शुभमन गिल? पराभवासाठी कुणाला धरलं जबाबदार?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com