Shubman Gill on Gujarat Titans Loss : शुक्रवारी झालेल्या आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे गुजरात टायटन्सचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. या सामन्यानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने पराभवाची कारणे सांगितली. तसेच त्याने साई सुदर्शन तसेच वॉशिंगटन सुंदर यांचे कौतुकही केले.