Sanju Samson Makes England Pay for Dropped Catch ( Photo Credit : Vijay Bate)
esakal
T20 World Cup India vs England Semi Final Marathi Cricket News: संजू सॅमसनेच्या नावाने वानखेडे स्टेडियम दणाणून गेले... अभिषेक शर्मा दुसऱ्याच षटकात माघारी परतण्याचे कोणतेच दडपण संजूने न घेता इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. त्याने स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक २७ चेंडूंत पूर्ण करताना मोठा विक्रम नोंदवला.. त्याला इशान किशनची साथ मिळाली आणि दोघांनी ४५ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. त्यानंतर शिवम दुबेला बढती दिली गेली आणि त्याने इंग्लंडच्या फिरकीपटूंना चोपला.. संजूचे शतक मात्र थोडक्यात हुकले.