Shikhar Dhawan Roasts Shahid Afridi on Air Strike Silence
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर ‘OPERATION SINDOOR’ कारवाई केली. भारताच्या स्टार क्रिकेटपटू शिखर धवनने ट्विटरवरून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर अप्रत्यक्षपणे चहा-पोस्टद्वारे जोरदार निशाणा साधला. शिखर धवनने आधीच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, 'भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई केली आहे, भारत माता की जय.' शिखर धवनच्या नावाने ही पोस्ट व्हायरल होताच नेटिझन्सनी आफ्रिदीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी हा आफ्रिदी कुठेय, असा सवाल केला.