
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आहे. पण असे असतानाही ऑस्ट्रेलिया समोरील खेळाडूंच्या दुखापतीच्या अडचणी थांबत नाहीयेत. या स्पर्धेपूर्वीच त्यांचे ५ अनुभवी खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर गेले आहेत.
आता ही स्पर्धा सुरु असतानाच त्यांना सहाव्या खेळाडूच्या दुखापतीचाही फटका बसला. फलंदाज मॅथ्यू शॉर्ट याला दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर जावे लागले असून त्याच्या बदली खेळाडूचीही घोषणा ऑस्ट्रेलियाने रविवारी (२ मार्च) केली.