
भारतीय संघाने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडवर मात केली. दुबईला झालेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ४४ धावांनी पराभूत करत सलग तिसरा विजय नोंदवला आहे. या सोबतच आता भारतीय संघ अपराजित राहून उपांत्य फेरीत खेळणार आहे.
भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला असल्याने अ गटात अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे आता भारताचा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध मंगळवारी होणार आहे. ऑस्ट्रेलिया ब गटात दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.