
भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश पक्का केला आहे. मंगळवारी (४ मार्च) दुबईला झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया संघाला ४ विकेट्सने पराभूत केले. भारताने एकूण पाचव्यांदा, तर सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
भारतीय संघ आता तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यास सज्ज आहे. यापूर्वी भारताने २००२ साली श्रीलंकेसह संयुक्तरित्या पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर २०१३ साली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर आता १२ वर्षांनी पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी भारताकडे आहे.