Shreyas Iyer shares crucial injury updates on Rohit Sharma and Mohammed Shami : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत मोहम्मद शमीच्या पायाच्या दुखापतीनं पुन्हा त्रास दिसल्याचे दिसले, तर रोहित शर्माही जवळजवळ ३० मिनिटे मैदानाबाहेर गेला होता. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. भारताचा पुढचा सामना रविवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे आणि या सामन्यात जलदगती गोलंदाज शमी व कर्णधार रोहित यांच्या खेळण्यावर शंका व्यक्त केली जात आहे.