

Champions Trophy 2025: वेळापत्रक जाहीर होणे लांबणीवर पडलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसंदर्भात आज (२९ नोव्हेंबर) आयसीसीची महत्त्वपूर्ण बोर्ड मिटिंग होत आहे, परंतु भारताचा नकार आणि पाकिस्तानची ताठर भूमिका यामध्ये आयसीसीची कुचंबणा झाली आहे.
आयसीसीच्या प्रमुख सदस्यांची ही बैठक आज ऑनलाइन होत आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचा संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास पाठवला जाणार नाही, या बीसीसीआयच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही.
स्पर्धा नियोजनानुसार खेळवायची असेल, तर हायब्रिड मॉडेलनुसारच खेळवावी यावर बीसीसीआय ठाम आहे. पाकिस्तान अशा कोणत्याही तडजोडीसाठी तयार नाही. त्यामुळे यातून कसा मार्ग काढायचा, हा प्रश्न आयसीसीसमोर आहे.