
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा सध्या हायब्रिड मॉडेलने खेळली जात आहे. भारताचे सामने दुबईत होत आहेत.
या स्पर्धेत अ गटातून भारत आणि न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर ब गटातून ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून दक्षिण आफ्रिकाही या गटातून उपांत्य फेरीत जाण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा साखळी सामना शनिवारी (१ मार्च) इंग्लंडविरुद्ध होत आहे.