
Pakistan vs New Zealand Live Marathi Update : गतविजेत्या पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचाा मोहम्मद रिझवानचा निर्णय पाकिस्तानच्या अंगलट आला. टॉम लॅथम व विल यंग यांच्या शतकांनी न्यूझीलंडला ३२० धावांचा डोंगर उभारण्यात मदत केली. पाटा खेळपट्टीवर पाकिस्तानचे वाघ डरकाळी फोडतील असे वाटले होते, परंतु ते कागदावरचे वाघ ठरले. फखर झमानला झालेल्या दुखापतीने पाकिस्तानचे गणित बिघडवले. Babar Azam मैदानावर उभा राहिला, पंरतु त्याच्या संथ खेळीने पाकिस्तानच्या अन्य फलंदाजांवर दडपण वाढवले आणि त्यांनी विकेट फेकल्या. बाबरच्या विकेटनंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी मैदान सोडण्यास सुरूवात केली.