
Pakistan’s semi-final qualification scenario after loss to New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने पाकिस्तानचा पुढच्या फेरीत जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. ८ संघांचा समावेश असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दोन गटांत विभागणी करून लढती होत आहेत आणि त्यामुळे एक पराभव संघाला स्पर्धेबाहेर फेकण्यासाठी पुरेसा आहे. गतविजेता पाकिस्तान यजमान म्हणून जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत, परंतु त्यांना न्यूझीलंडने पराभवाचा दणका दिला आणि त्यांचे उपांत्य फेरीत जाण्याचे वांदे केले.