Afghanistan vs Australia, Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात करताना अफगाणिस्तानला टेंशन दिलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या ब गटातील त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. पण, सध्या मुसळधार पावसाने बाजी मारलेली दिसतेय. संपूर्ण मैदान झाकण्यात आले आहे आणि प्रचंड पाणी साचले गेले आहे. त्यामुळे हा सामना होण्याची शक्यताच कमी आहे. हा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल आणि मग पुढे काय?