Who will challenge the Indian team in the semi-finals? न्यूझीलंड संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अ गटातील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. न्यूझीलंडच्या या विजयाने भारताचेही स्थान निश्चित झाले आहे. अ गटात भारताने बांगलादेश व पाकिस्तान यांना पराभूत केले, तर न्यूझीलंडनेही या दोन स्पर्धकांना धूळ चारली. त्यामुळे रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला सामना काँटे की टक्कर असेल. कारण, उपांत्य फेरीत खेळण्यापूर्वी दोन्ही संघ विजयी लय कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असतील. पण, उपांत्य फेरीत भारतासमोर कोणाचे आव्हान असेल?