Pakistan Embarrassed Again : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तानच्या संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर, त्यांना टीम इंडियाने पुन्हा एकदा नाक घासायला लावले. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून गतविजेत्यांना बाद व्हावे लागले. १८० कोटी रुपये खर्च करून या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) स्टेडियमचे नुतनीकरण केले होते. २०१७ च्या विजेत्या पाकिस्तानला पुन्हा एकदा जेतेपद जिंकण्याची खात्री होती, परंतु त्यांना अनपेक्षितपणे पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. आज रावळपिंडीत त्यांचा शेवटचा साखळी सामना बांगलादेशविरुद्ध होत आहे आणि त्यातही त्यांच्यावर नामुष्की ओढावण्याचे संकेत मिळत आहेत.