

Nathan Ellis injury IPL 2026 CSK replacement options.jpg
esakal
Nathan Ellis injury IPL 2026 CSK replacement options: चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीगचे १९ वे पर्व सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. आयपीएल २०२६ च्या पहिल्या लढतीत CSK ला राजस्थान रॉयल्सचा सामना करावा लागणार आहे. मथिशा पथिराणा याला लिलावात आधीच गमावल्यामुळे CSK ची गोलंदाजी कमकुवत वाटत होती, त्यात आता ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज नॅथन एलिस याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. ३१ वर्षीय गोलंदाजाला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे आणि तो निर्धारित वेळेत पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकणार नाही.