चेतेश्वर पुजाराने रविवारी सोशल मीडियावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
तो जवळपास दोन वर्षांपासून टीम इंडियाबाहेर होता आणि आयपीएलमध्येही त्याला संधी मिळाली नव्हती.
२०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर त्याने भारतासाठी कसोटी सामना खेळलेला नाही.
Why did Cheteshwar Pujara retire from Indian cricket? मला भारतीय संघात पुनरागमन करायचे आहे, रणजी करंडक स्पर्धेचा आणखी एक हंगाम खेळायचा आहे... असे बोलणारा चेतेश्वर पुजारा, अचानक निवृत्ती जाहीर करतो. पुजाराने रविवारी सोशल मीडियावर पोस्ट लिहून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो जवळपास दोन वर्ष टीम इंडियाच्या बाहेर होता, आयपीएलमध्येही त्याला कोणी ताफ्यात घेतले नाही. असे असले तरी त्याची खेळण्याची भूक संपलेली नव्हती. त्यामुळेच त्याच्या अचानक निवृत्ती घेण्यामागे अनेक तर्क लावले जात आहेत.