विराट कोहली, रोहित शर्मा, आर. अश्विन आणि चेतेश्वर पुजारानंतर टीम इंडिया आता युवा खेळाडूंवर आधारित आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत संपली.
माजी फलंदाज चेतेश्वर पुजाराने केएल राहुलला सर्वात विश्वासार्ह कसोटी फलंदाज म्हटले आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा, आर अश्विन, चेतेश्वर पुजारा अशा एकेक स्टार खेळाडूंनी कसोटी क्रिकेटला रामराम केला. आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा संघ घडतोय आणि नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यावर गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका २-२ अशी बरोबरी रोखली. गिलने ही मालिका गाजवली असली तरी माजी फलंदाज पुजाराचा याचा सध्याच्या संघातील एका फलंदाजावर जरा जास्तच विश्वास आहे. तो गिल किंवा यशस्वी जैस्वाल नाही.