
Australia vs India Test: भारतीय क्रिकेट संघासाठी रविवारचा दिवस फारसा खास राहिला नाही. भारताला रविवारी (५ जानेवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्याच सिडनीमध्ये तिसऱ्याच दिवशी ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.
या पराभवामुळे भारतीय संघाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील आव्हानही संपले, तसेच भारताला मालिकाही ३-१ अशा फरकाने गमवावी लागली. सिडनी कसोटीत भारताला दुसऱ्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीचीही कमी भासली.