
Australia vs India Test Series: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने रविवारी (५ जानेवारी) भारतीय संघाला कसोटी मालिकेतील सिडनीला झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात६ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ३-१ अशा फरकाने जिंकली.
इतकेच नाही, तर या विजयासह ऑस्ट्रेलियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ (WTC 2023-25) स्पर्धेच्या अंतिम सामन्यातीलही प्रवेश पक्का केला आहे. त्यामुळे भारताचे आव्हान मात्र संपुष्टात आले.