T20I Record: क्रोएशियाच्या २३ वर्षीय फलंदाजाचा अविश्वसनीय वर्ल्ड रेकॉर्ड; IPL सोडा पठ्ठ्याने ३ सामन्यांत जगाचे लक्ष वेधले

Connor Carroll T20I world record explained: क्रोएशियाच्या २३ वर्षीय फलंदाज कॉनर कॅरोलने ट्वेटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अविश्वसनीय वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
Connor Carroll created a historic T20I world record

Connor Carroll created a historic T20I world record

esakal

Updated on

Connor Carroll created a historic T20I world record: क्रोएशियाचा सलामीवीर कॉनर कॅरोल याने पुन्हा एकदा आपल्या बॅटने धुमाकूळ घालत ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय विश्वविक्रम रचला आहे. आपल्या तिसऱ्या ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ७४ धावा करणाऱ्या या २३ वर्षीय खेळाडूने, ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या तीन डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम मोडला आहे. आपल्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये अविश्वसनीय २९५ धावा करून त्याने फ्रान्सच्या गुस्ताव मॅककिऑनला ( Gustav McKeon) मागे टाकले आहे, ज्याच्या नावावर यापूर्वी २८६ धावा होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com