CPL 2025 मधील SLK वि. GAW सामन्यात ओशेन थॉमसने विक्रमी खराब षटक टाकले.
GAW चा अष्टपैलू रोमारिओ शेफर्डने एका चेंडूत २२ धावा काढून इतिहास रचला.
थॉमसने नो-बॉल आणि वाईडमुळे गफलत केली व शेफर्डने सलग तीन षटकार ठोकले.
Oshane Thomas worst bowling CPL 2025 : कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL)मध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत. सर्व संघ प्रतिष्ठेच्या या T20 लीगचे विजेतेपद पटकावण्यासाठी झुंज देत आहेत. २०२५ हंगामातील १३व्या सामन्यात सेंट लुसिया किंग्स (SLK) आणि गयाना अॅमेझॉन वॉरियर्स (GAW) यांच्यातल्या लढतीत अचंबित करणारा प्रसंग घडला.