

Cricket Canada President House Shooting:
Sakal
क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. क्रिकेट कॅनडाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरविंदर खोसा यांच्या घरावर अचानक गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. कॅडनातील ब्रिटीश कोलंबिया प्रांतामधील सरे शहरात त्यांचे घर आहे.
या भागात भारतीय वंशाचे आणि विशेषत: पंजाबी लोकांची मोठी लोकसंख्या आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे अरविंदर खोसा यांच्यावर घरावर गोळीबार झाल्याचे त्यांनी पुष्टी केली आहे.