
चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर २०२८ साली लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. मुंबईत पार पडलेल्या १४१व्या IOC च्या अधिवेशनात हा निर्णय घेतला गेला. क्रीडाविश्वातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकमध्ये आता क्रिकेटच्या समावेश झाला आहे आणि सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, या ऐतिहासिक क्षणात रोहित शर्मा व विराट कोहली यांना सहभाग घेता येणार नाही.