
Dombivali Latest News: मुंबई रणजी संघात डोंबिवली मधील क्रिकेटपटू श्रेयस गुरव याची निवड झाली आहे. वयाच्या 10 व्या वर्षापासून श्रेयसने क्रिकेट प्रशिक्षक राजन धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सराव करण्यास सुरुवात केली. श्रेयस हा उत्कृष्ट स्पीनर गोलंदाज असून गेल्या वर्षभरात त्याने 84 फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहेत. रणजी संघात त्याची निवड झाल्याने प्रशिक्षक धोत्रे व सहकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.