
गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा खेळांच्या मैदानात खेळाडूंनी जीव गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील अनेकांनी हृदयविकाराच्या झटक्यांमुळे जीव गमावले आहेत. आता अशीच एक धक्कादायक घटना पंजाबमध्ये घडल्याचे समोर आले आहे. क्रिकेटचा सामना खेळत असताना एक खेळाडू अचानक मैदानात कोसळला आणि त्याने जीव गमावला आहे.